¡Sorpréndeme!

kolhapur Ambabai Mandir | श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा | SakalMedia

2021-10-14 93 Dailymotion

kolhapur Ambabai Mandir | श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा | SakalMedia
कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. काल रात्री नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्याने आज सकाळी नऊ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. दुपारी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. चामुंडा मातृका ही यमाची शक्ती असून तिला काली, चामुंडी म्हणूनही ओळखले जाते. तिच्या गळ्यात मुंडमाळा तर हातात डमरू, त्रिशूल, तलवार, वाडगा आहे. काही धर्म ग्रंथानुसार तिला शंकराची शक्ती म्हणतात. ती वाद्यावर आरूढ असून रंग गडद लाल आणि चेहरा रौद्र आहे, अशी माहिती श्रीपूजक मयूर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी दिली. (व्हिडिओ- मोहन मेस्त्री)
#kolhapur #AmbabaiTemple #AmbabaiTemplekolhapur #Mahalaxmitemplekolhapur #mahalaxmitemplekolhapurlive #mahalaxmitemplekolhapurmarathi #ShreeMahalaxmiAmbabaiTempleKolhapur #SakalMedia